दीड हजाराचे ट्रिमर पडले 65 हजाराला; ऑनलाईन व्यवहार करताना महिलेला गंडा

गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधने (Online Fraud) महिलेला चांगलेच महागात पडले. दीड हजार रुपयाच्या ट्रीमर मशीनच्या दुरूस्तीसाठी चोरट्याने भूलथापा देऊन तब्बल 65 हजार रुपयाने गंडा घातला.

    वर्धा : गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधने (Online Fraud) महिलेला चांगलेच महागात पडले. दीड हजार रुपयाच्या ट्रीमर मशीनच्या दुरूस्तीसाठी चोरट्याने भूलथापा देऊन तब्बल 65 हजार रुपयाने गंडा घातला. ही घटना हिंदी विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिका विनोदकुमार शुक्ला यांनी ई कॉमर्स साईटवरून ऑनलाईन दीड हजार रुपयाचा ट्रीमर विकत घेतला होता. ट्रीमर ब्लेड खराब निघाल्याने वस्तू परत करण्यासाठी गुगलवर ई-कॉमर्स साईच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यावर फोन करून वस्तू परत करण्यासंदर्भात माहिती दिली. त्याने पैसे रिफंड करण्यासाठी प्रोसेस सांगत एनी डेक्स नावाचे ऍप मोबाईलमध्ये मागविली. हे अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले.
    त्यानंतर गुगल पे पीन नंबर आणि काही तांत्रिक माहिती भरायचे सांगून पुन्हा प्रोसेस करायला सांगितली.

    दरम्यान, बँकेच्या खात्यावर असलेले 32 हजार 472 रुपये दोन वेळा खात्यावरून कपात झाल्याचे संदेश महिलेच्या मोबाईलवर प्राप्त झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात गुन्हा नोंद केला.