Talathi, a bribe-taker in Maval, in ACB's net; A bribe of 50,000 was taken for registration on seven-twelve passages
ACB action

  पुणे : पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाचदिवशी तिहेरी कारवाईकरत ३ अधिकाऱ्यांविरोधात अपसंपदाचे गुन्हे दाखल केले आहेत. तिघांकडेही उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आढळली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे, सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकारी किरण लोहार, त्यांची पत्नी आणि मुलगा तसेच सांगली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणअधिकारी विष्णू कांबळे व त्यांची पत्नी यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तिघेही सेवानिवृत्त अधिकारी असून, त्यांच्या मालमत्तेची पुणे एसीबीकडून चौकशी सुरू होती. उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी संपत्ती आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
  तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा. पिंपळे गुरव) यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सन १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत सुपे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे परीक्षण करून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
  ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
  तुकाराम सुपे यांच्या विरोधात शहर सायबर पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेली दोन कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपये रोकड आणि ७२ लाख रुपये किमतीचे १४५ तोळे सोने असा एकूण तीन कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुन्हा दाखल झाला, तेव्हा तुकाराम सुपे हे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी धारण केलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमावली होती.
  अधिक रक्कम असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा
  त्यांच्या नोकरीच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.
  ज्ञात उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अधिक संपत्ती
  दुसरा गुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार व कुटूंबावर दाखल झाला आहे. याप्रकरणी सोलापूर पोलिसांत सोलापूर एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी तक्रार दिली आहे. यानूसार किरण आनंद लोहार (वय ५०) पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४) व मुलगा निखिल लोहार (वय २५, रा. आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) गुन्हा नोंद केला आहे. १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीतील चौकशी केली आहे. त्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अधिक संपत्ती आढळली आहे.
  भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित
  एसीबीने केलेल्या चौकशीत लोकसेवक किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपये इतकी अपसंपदा आढळून आली आहे. व त्यांची पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल यांनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
  चौकशीत उत्पन्नापेक्षा ३६ टक्के जास्त संपदा
  तसेच, तिसरा गुन्हा सांगली जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळे (वय ५९) तसेच त्यांची पत्नी जयश्री कांबळे (रा. सध्या बार्शी) यांच्यावर दाखल झाला आहे. याबाबत सांगली एसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी १६ जून १९८६ ते ४ मे २०२२ या कालावधीत चौकशी केली आहे. चौकशीत उत्पन्नापेक्षा ३६ टक्के जास्त संपदा आढळली आहे.
  अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा

  लोकसेवक विष्णू यांनी कर्तव्य करीत असताना भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा मिळविल्याचे समोर आले आहे. त्यांची पत्नी जयश्री यांनी विष्णू कांबळे यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा दिली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.