पंतप्रधानांच्या सभास्थळी जय्यत तयारी; हजारो वारकरी राहणार उपस्थित

ढगाळ वातावरण असल्याने मंडप वॉटर प्रूफ पद्धतीचे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ( मंगळवारी ) वारकरी संप्रदायाला काय संबोधित करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत दाखल झाला आहे.

    पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहूत दाखल ( Modi Dehu Visit ) होणार आहे. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ( Sant Tukaram Maharaj ) मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. तेथील तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्या ३०- ४० हजार वारकरी, नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

    ढगाळ वातावरण असल्याने मंडप वॉटर प्रूफ पद्धतीचे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ( मंगळवारी ) वारकरी संप्रदायाला काय संबोधित करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत दाखल झाला आहे. वारकरी उद्याच्या दिवसाची वाट पाहत असून मोदी पहिल्यांदाच देहूत येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.