
बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या घरासमोर असणाऱ्या खडीच्या कारणावरून ऋषिकेश रामचंद्र जोंधळे व दतात्रय शंकर डवरी यांच्यामध्ये १ जून रोजी वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
उतूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या घरासमोर असणाऱ्या खडीच्या कारणावरून ऋषिकेश रामचंद्र जोंधळे व दतात्रय शंकर डवरी यांच्यामध्ये १ जून रोजी वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. डवरी यांनी आपल्याला मारहाण जोंधळे व त्यांच्या परिवाराने केली असल्याची तक्रार आजरा पोलिसांत केली होती. तेव्हापासून डवरी व जोंधळे यांच्यात धुसफूस सुरु होती.
दरम्यान, रामचंद्र जोंधळे यांनी जिल्हा पोलिस अधक्षिक शैलेश बलकवडे यांना पत्र पाठवून कुटूंबाला धोका आहे. तरी संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात १३ नोव्हेंबर २०२० रोजी जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना ऋषिकेश हा अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाला आहे. आमदार, खासदार निधीतून ऋषिकेशच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डवरी यांच्या घराचे समोर बांधकाम सुरू आहे.
बदनामीकारक डिजिटल
काम सुरु असताना ग्रामसेवक असणारा राजेंद्र उर्फ दतात्रय शंकरनाथ डवरी वारंवार त्रास देत आहेत. शिवीगाळी करीत तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले. ज्या तिरंग्यातून मुलाचे पार्थिव आले तो तिरंगा सुद्धा बळजबरीने काढायला लावल्याचा आरोप वीर माता पित्यांनी केला आहे. गावामध्ये बदनामीकारक डिजिटल उभा करून डवरी यांनी नाहक बदनामी केली. स्वतः जखमी असल्याचा डिजिटल फोटो लावून सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे रामचंद्र जोंधळे यांचे मत आहे.