
सायन-माटुंगा ब्रिजवर (Sion-Matunga Bridge) ट्रकचा अपघात झाला. यावेळी ट्रकचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने थेट ट्रकच दुभाजकावर चढवला. या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई / स्वप्निल शिंदे : सायन-माटुंगा ब्रिजवर (Sion-Matunga Bridge) ट्रकचा अपघात झाला. यावेळी ट्रकचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने थेट ट्रकच दुभाजकावर चढवला. या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे दादरहून सायनला जाणारा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास झाला.
सायन-माटुंगा ब्रिजवर सतत वाहतूक असते. त्यात हा ट्रक ( एमएच 43 बीजी 6807) दुभाजकावर जाऊन चढल्याने अपघात झाला. सकाळी झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये एक रुग्णवाहिका देखील अडकल्याची माहिती दिली जात आहे.
दरम्यान, ट्रकचालक सुरक्षित असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायन-माटुंगा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी अपघातस्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.