अमरावतीत ट्रक व तवेराचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

पोटे कॉलेजपासून काही अंतरावरच तवेरा गाडीने एका दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक तवेरा गाडीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की तवेरा गाडीवर आदळलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विजेच्या खांब तोडून रस्त्याच्या कडेला गेला.

    अमरावती : दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेराची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण यात गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती शहरातून जाणाऱ्या नांदगाव पेठ देवलगाव रिंग रोडवर हा अपघात झाला.  इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला असून ट्रकचे दोन्ही चाक बाहेर आले आहेत.

    अंजनगाव सुर्जी येथील एक कुटुंब लग्नानिमित्त तवेरा गाडीने रिंग रोडने वलगाव कडून नांदगाव पेठच्या दिशेने जात होते. ट्रक अमरावतीहून नागपुरच्या दिशेने जात होता. पोटे कॉलेजपासून काही अंतरावरच तवेरा गाडीने एका दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक तवेरा गाडीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की तवेरा गाडीवर आदळलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विजेच्या खांब तोडून रस्त्याच्या कडेला गेला. अपघात झाल्याचे लक्षात येताच लगेच कंपनीत काम करणारे कामगार धावून आले. तवेरा मधील पाच पैकी चारजण घटनास्थळीच ठार झाले होते. तर एका व्यक्तीला नागरिकांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृतक व जखमी हे अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. सध्या जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार असून रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली.