मुरमाडी गावतलाव पुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात; एक जण ठार, एक जखमी

मूलकडून सिंदेवाहीकडे दुचाकीने येत असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकीची ट्रकला (Truck in Sindewahi) जबर धडक बसली. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाल्याची घटना येथे घडली.

    सिंदेवाही : मूलकडून सिंदेवाहीकडे दुचाकीने येत असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकीची ट्रकला (Truck in Sindewahi) जबर धडक बसली. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाल्याची घटना येथे घडली. दत्तू चावरे असे मृतकाचे नाव आहे. सिंदेवाही येथील अमोल यवणकर (वय 35) आणि दत्तू चावरे (वय 45) हे दोघे दुचाकीने (एमएच. 34 ए. ई. 2339) मूलकडून सिंदेवाहीकडे जात होते.

    मुरमाडी गाव तलावचे पुलाजवळ शुक्रवारी आठ वाजताच्या सुमारास अज्ञात ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी ट्रकवर आदळली. दोघेही गंभीर जखमी झाले. या मार्गावरून जात असताना अपघाताची घटना मुप्पीडवार यांच्या लक्षात येताच ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर जखमींना पोलिस वाहन व मुप्पीडवार यांच्या वाहनाने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले.

    जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दत्तू चावरे यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. तर अमोल मधुकर यवणकर याला ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांदरम्यान दत्तू चावरे यांचा चंद्रपूर येथे मृत्यू झाला. मृतक दत्तू चावरे हे नगर पंचायत सिंदेवाही-लोनवाही येथे पंपचालक या पदावर कार्यरत होते. ट्रकचालक पसार झाला असून, घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.