नवले पूल अपघात प्रकरणी फरार ट्रक चालकला अटक

पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघातात ट्रकने धडक दिल्यामुळे जवळपास ३० ते ३५ गाड्यांना धडक दिली होती. या भीषण अपघातामध्ये किमान ३० गाड्यांचे नुकसान झाले.

    पुणे : पुण्यातील नवले पूल येथे एका ट्रकने तब्बल ३० ते ३५  गाड्यांना टक्कर दिल्याने अपघात झाला होता. या घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. अखेर दोन दिवसानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे. पुण्यातील चाकण नाणेकरवाडी येथून पोलिसांनी त्याला अटक आहे. मनीराम यादव असे या ट्रक चालकाचे नाव आहे.

     

    कसा झाल अपघात

    पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघातात ट्रकने धडक दिल्यामुळे जवळपास ३० ते ३५ गाड्यांना धडक दिली होती. या भीषण अपघातामध्ये किमान ३० गाड्यांचे नुकसान झाले. तर,  यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले. नवले पुलावर झालेल्या अपघाताची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. इंधन वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाने उतारावर वाहन न्यूट्रल केल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ट्रकचं नियंत्रण सुटल्याने त्याने पुलावरील वाहनांना धडक दिली. त्यानंतर अनेक वाहनांची आपसात धडक झाल्याने मोठा अपघात झाला.

    बंगळुरु-मुंबई बाह्य वळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्गाभोवती अफाट नागरिकीकरण झालं आहे. त्याच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. दक्षिणेकडील अनेक राज्यातील अवजड वाहने ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे आपआपल्या राज्यातील माल वाहतूक करत असतात. यामुळे २४ तास हा महामार्ग गजबजलेलाा असतो. परंतु त्याच वेळी हा मार्ग जीवघेणा ठरताना दिसत आहे. त्यामुळे नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे.