कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी  प्रयत्न करू ; प्रदीप वळसे पाटील यांचे आश्वासन

  वसंत अवसारीकरांचा पुरस्काराने सन्मान

    मंचर : आंबेगाव, जुन्नर, शिरूर या परिसरात मोठ्या प्रमाणावर कलाकार आहेत. कलेच्या विविध क्षेत्रात त्यांचं काम मोठे आहे. या  कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करू, असे मत भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
    स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने मंचर येथील बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलाकारांचा कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रदीप वळसे पाटील बोलत होते. व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदचे माजी सदस्य शेखर दादा पाचुंदकर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,नाट्य दिग्दर्शक रामदास काळे, स्वराज्य कलाकार महासंघाचे अध्यक्ष रामदास करंडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आदिनाथ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले,  कलाकारांना जे सहकार्य हवे असेल ते सहकार्य करण्यासाठी तालुक्यातील विविध संस्था संघटना कायमच अग्रेसर राहतील.

    -विविध कलावंतांचा पुरस्काराने गौरव
    यावेळी वसंत अवसरीकर यांना जिवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तर कृतज्ञता पुरस्कार – रामदास काळे, कलासमर्पित पुरस्कार – नामदेव काळे,  कलासमर्पित पुरस्कार – बबन  वाघ, नाट्य- यशवंत शिंदे, तमाशा- कुंडलिक  शेवाळे, दिग्दर्शन – अनिल  ठोसर, शाहीर थोरात, संगीत- हभप कैलास महाराज सुक्रे, भजन -कोंडीबा  भोर,  भारुड -बाळासाहेब  मडके, सनई-दत्ता गायकवाड, जागरण- दिनेश जाधव आणि पार्टी, नृत्य – किशोर  नवले, लेखन- अविनाश  वाघ यांना कलागौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

    यावेळी शेखर पाचुंदकर याचे भाषण झाले. प्रास्ताविक रामदास काळे, सूत्रसंचलन निलीमा वळसे तर आभार रामदास करंडे यांनी मानले. यावेळी विशाल करंडे, हुसेन शेख, शशिकांत वाघ, नवनाथ वाघ, रामदास सैद, विजय साळवे, नितीन केंगले,कांचन टेके राजेंद्र गुंजाळ, कैलास करंडे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.