Life in danger for Tulja Bhavani's darshan; There is no action from the local administration when everyone starts arbitrarily

नऊ दिवस साजरा होणारा सण म्हणजे नवरात्री (Navratri) हा सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानी मंदिर (Tulajabhavani Mandir) प्रशासनाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी एक आनंदाचा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    तुळजापूर : मागील वर्षापासून म्हणजे कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी झाल्यापासून राज्यातील सर्व सण, उत्सव (Festival) निर्बंधांविना साजरे केले जात आहेत. दरम्यान, या वर्षी शंभर टक्के व कोणत्याही नियमावली शिवाय गोविंदा, गणपती (Govinda and Ganpati) उत्सव साजरे करण्यात आले. आता नऊ दिवस साजरा होणारा सण म्हणजे नवरात्री (Navratri) हा सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानी मंदिर (Tulajabhavani Mandir) प्रशासनाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी एक आनंदाचा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    दरम्यान, नवरात्रीनिमित्त तुळजाभवानी हे भाविकांसाठी आता २४ तासांपैकी २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत देवीचे दर्शन घेता येणार आहे. मागील दोन वर्ष राज्यात कोरोनामुळं मंदिरातील दर्शनावर पूर्णपणे बंदी होती, मात्र यंदा दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच भाविकांना मंदिरात कोणत्याही निर्बंधांशिवाय मंदिरात देवीचे दर्शन घेता येणार आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात तुळजाभवानी मंदिर २२ तास खुले राहणार आहे. रात्री १ वाजता हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असून, ते रात्री 11 वाजपर्यंत म्हणजे २२ तास खुले राहणर आहे. नवरात्रीनिमित्त होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे.