“तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हो…, तो हम मुख्यमंत्री बनना चाहते है”; बच्चू कडू मुख्यमंत्री होणार? काय म्हणाले कडू…

प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. हा अमरावतीचा पक्ष आहे. दिल्ली, मुंबईचा पक्ष नाही. याआधी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला आहे.

अमरावती: शिंदे गटातील (Shinde Group) ४० आमदारांनी बंड केल्यामुळं राज्यात सत्तांतर घडून आले. आता शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde fadnavis government)  ८ महिने होताहेत. तब्ब्ल ८ महिन्यानंतर देखील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळं शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण हिवाळी अधिवेशन झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात होतं, मात्र मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्यानं आमदारांमध्ये नाराजी वाढत असून, मविआ सरकारमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी नाराजी व्यक्त केली असून, पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठे वक्तव्य केलं आहे.

तो हम मुख्यमंत्री बनना चाहते है

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी याआधी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी व्यक्त केली आहे, आता पुन्हा एकदा कडूंनी नाराजी व्यक्त करताना मोठं वक्तव्यं केलं आहे. बच्चू कडू हे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. आपल्या मंत्रीपदावर लाथ मारून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण आता ८ महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपद मिळालं नसलं तरी आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. “तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हौ, तो हम मुख्यमंत्री बनना चाहते है”, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. ते अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बच्चू कडूंचा मुख्यमंत्री पदावर दावा…

प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. हा अमरावतीचा पक्ष आहे. दिल्ली, मुंबईचा पक्ष नाही. याआधी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला आहे. लोकं आम्हाला म्हणते गद्दारी का केली? असं विचारतात. पण आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा पक्ष आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळं आश्चर्यं व्यक्त होत असून, कडूंच्या या वक्तव्यामुळं चर्चांन उधाण आलं आहे. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.