tunisha sharma

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. तिच्या निधनाने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून कोणीही सावरत नाही. काही वेळात तिच्या अंतिम संस्काराला सुरुवात होणार आहे.

    मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मावर (Tunisha Sharma)  आज अंत्यसंस्कार होणार आहेत. तुनिषाच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वासह तिच्या कुटुंबियाना खूप मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील जे. जे.रुग्णालयात तिच शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर काल रात्रीच्या सुमारा तिचा मृतदेह तुनिषाची आई आणि तिच्या काकांकडे सोपवण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास तिच्या अंत्यसंस्कारावा सुरुवात होणार आहे.

     

    तुनिषाचा मृतदेह पाहून आईची दयनीय अवस्था

    तुनिषाने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी हे जग सोडले तेव्हा तिच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणे आपल्यासाठी कठीण आहे. तुनिषाच्या अचानक जाण्याने तिची आई दु:खी झाली आहे. त्याच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच कळत नाही आहे. काल रात्री ती तिचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली तेव्हा ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला हॉस्पिटलच्या बाहेर आणले तेव्हा त्या चालूही शकत नव्हत्या.

     

    शिझानने केला नवा खुलासा

    तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानकडून रोज काही ना काही नवे खुलासे होत आहेत. तुनिषा आणि त्याचा तीन महिन्यांत ब्रेकअप झाल्याची माहिती त्याने दिली आहे. तर दोघांमध्ये वयामध्ये अंतर असल्याने आणि धर्म वेगळे असल्याने ब्रेकअप केल्याचं त्याने यापुर्वीही सांगितले आहे.

     

    तुनिषाच्या  कुटुंबीयांनी निवेदन जारी

    अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. तिच्या निधनाने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून कोणीही सावरत नाही. काही वेळात तिच्या अंतिम संस्काराला सुरुवात होणार आहे. त्यापुर्वी ‘प्रत्येकाने दिवंगत आत्म्याला निरोप द्यावा’, असे निवेदन कुटुंबीयांनी जारी केले आहे.