आधी ट्वीट नंतर डिलीट! “CM होण्यासाठी 45 नाही, 145 आमदार लागतात…”, मोहित कंबोज यांचा अजित पवारांना टोला

लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासंबंधीची चिठ्ठी आढळल्यामुळे या चर्चाना उधाण आलं असून, यावर भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे.

    मुंबई – सध्या राज्यात मुख्यमंत्री बनण्याचे आणि स्वप्न पाहण्याचे पेव फुटले आहे. विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आपापल्या आवडत्या नेत्यांचे मोठे बॅनर लावत ‘भावी मुख्यमंत्री’ अशी इच्छा व्यक्त करताहेत. किंवा ‘भावी मुख्यमंत्री’ असे वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर पाहयला मिळाले आहे. ह्या सर्व घटना ताज्या असताना, आता अजित पवार मुख्यमंत्री व्हावे म्हणून चक्क एका कार्यकर्त्याने लालबागचा राज्याकडे साकडे घातले आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासंबंधीची चिठ्ठी आढळल्यामुळे या चर्चाना उधाण आलं असून, यावर भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे. (tweet first then delete it takes one hundred fourty five mla not fourty five to become com mohit kamboj taunt to ajit pawar)

    काय आहे प्रकार?

    दरम्यान, याआधी सुप्रिया सुळे, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदींचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे पोस्टर लावल्याचे पाहयला मिळाले आहे. दरम्यान, आज अजित पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी एक चिठ्ठी अर्पण केली. ”हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे”, असे चिठ्ठित लिहिले त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, यानंतर यावर कंबोज यांनी टिका करताना आधी ट्विट केले आणि मग डिलीट केले.

    आधी ट्वीट नंतर डिलीट…

    रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाकडे अजित पवारांसाठी साकडे घातल्यानंतर, यावर टीका करताना कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून टिका केली. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 सदस्यांची गरज असते असे म्हटले आहे. याद्वारे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. या ट्विटमुळे वाद होताच त्यांनी काही वेळातच ते ट्विट डिलीट केले. दरम्यान, रणजीत नरोटे यांनी राजाच्या चरणी साकडे घातल्यानंतर अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.