झाली ना पंचाईत! कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ट्विटर अकाऊंट झालं हॅक

कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच काही ना काही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ही पालिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

    कल्याण : केडीएमसीचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. दरम्यान, या वृत्ताला केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी देखील दुजोरा दिलाय. ट्विटर अकाऊंट तासाभरात पुन्हा रिस्टोर केल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलाय. यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्याच्या बाबक संबंधितांना सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगीतलं आहे. तसेच अकाऊंटवर टाकण्यात आलेले सर्व ट्विट डिलीट केल्याची माहिती त्यांनी दिली.