“घरचा उपाशी आणि बाहेरचा तूपाशी…”, जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्वीटरवॉर, दोघांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये? वाचा…

मालेगावच्या सभेत ठाकरे गटाचे बॅनर ऊर्दूत लावण्यावरुन शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर व उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. या टिकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्रर दिल्यानं, पुन्हा त्याला म्हात्रे यांनी पलटवार केल्यानं दोघांत ट्विटवॉर सुरु आहे. यानंतर आव्हाडांनी म्हात्रेंना चांगलाच जिव्हारी लागणारे प्रतिउत्तर दिलं आहे.

मुंबई- राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट- भाजपा (Shinde group and BJP) व मविआतील (MVA) आमदार अनेकवेळा आमनेसामने  आले आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्यात ट्विटरवॉर सुरु आहे. मालेगावच्या सभेत ठाकरे गटाचे बॅनर ऊर्दूत लावण्यावरुन शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर व उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. या टिकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्रर दिल्यानं, पुन्हा त्याला म्हात्रे यांनी पलटवार केल्यानं दोघांत ट्विटवॉर सुरु आहे. यानंतर आव्हाडांनी म्हात्रेंना चांगलाच जिव्हारी लागणारे प्रतिउत्तर दिलं आहे.

काय आहे शितल म्हात्रेंचं ट्विट?

“ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं…नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा?? #उध्वस्त_ सेना #खांग्रेसची_चमचेगिरी #मालेगाव, असं ट्विट केलं. यानंतर याला आव्हाडांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाडांचं ट्विट?

शीतल म्हात्रेंच्या याच ट्वीटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दू भाषेतील बॅनर प्रसिद्ध केला. दुसऱ्यांवर ढकलायची तुमची सवय आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शीतल म्हात्रेंना डिवचलं. यावर पुन्हा म्हात्रेंनी ट्विट केलं आहे. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेली गझलही त्यांनी पोस्ट केली.

वार…पलटवार

“उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड त्यांच्या बचावासाठी आल्याने शीतल म्हात्रे यांनी पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणा-या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं… पण मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, “मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही … लोकांसाठी कार्येक्रम करतो .. माझ्या मतदार संघात येऊन विचारा …. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही …. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला”. पुन्हा यावर म्हात्रेंनी ट्विट करत एकमेकांचे ट्वीट रिट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी पुन्हा आव्हाडांना डिवचलं. “पवारांची भाकरी खाऊन उद्धवजींची चाकरी करतात” असा पलटवार म्हात्रेंनी केला.

उगाच बोलायला लावू नका – आव्हाड

दरम्यान, म्हात्रेंच्या “पवारांची भाकरी खाऊन उद्धवजींची चाकरी करतात” या ट्विटला उत्तर देताना, जितेंद्र आव्हाड यांनी म्हात्रेंना सज्जड दम दिला. “तुम्हाला चिंता नसावी. उगाच बोलायला लावू नका. घरचा उपाशी बाहेरचा तुपाशी” अशा शब्दांत आव्हाडांनी म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं याला म्हात्रे आता काय उत्तर देतात हे पाहवे लागले.