दुचाकी वाहने चोरणाऱ्या १८ वर्षांच्या दोन तरुणांना ठोकल्या बेड्या, हडपसर पोलिसांच्या तपास पथकाची धडक कारवाई; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची उकल

विविध भागातून तसेच उच्चभ्रु परिसरातील वाहने चोरणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. दोघांकडून दहा गुन्ह्यांची उकल करत तब्बल सव्वा सात लाखांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पेट्रोलिंगदरम्यान त्यांना पकडण्यात यश आले आहे.

    पुणे : शहरातील विविध भागातून तसेच उच्चभ्रु परिसरातील वाहने चोरणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. दोघांकडून दहा गुन्ह्यांची उकल करत तब्बल सव्वा सात लाखांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पेट्रोलिंगदरम्यान त्यांना पकडण्यात यश आले आहे.

    दत्ता शिवाजी दहिफळे (वय १८, रा. हडपसर, मुळ. बीड) व बाबुराव धर्मराज तोंडे (वय १८, रा. किल्ले धारूर, बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून हडपसरमधील ५ आणि बीड जिल्ह्यातील २ असे गुन्हे उघड झाले असून, उर्वरित दुचाकींच्या मालकांचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिंगबर शिंदे, सहाय्यक निरीक्षक विजयकुमार शिंदे तसेच पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.

    शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पोलीस देखील या घटनांमुळे हैराण आहेत. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बैठकीला वारंवार सूचना दिल्या जात आहेत. वाहन चोरीच्या गुन्ह्यांकडे गांर्भियाने लक्ष घालावे असे स्पष्ट आदेशही दिले आहेत. दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या सूचनेनुसार तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोघे संशयितरित्या दुचाकीवरून जाताना दिसले. पथकाने लागलीच या दोघांना अडवून त्यांच्याकडे चौकशी केली. पण, त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिली. संशय बळावल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणले. दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी चोऱ्या केल्याचे दिसून आले. त्यांना एका गुन्ह्यात अटक करून सखोल तपास केला असता त्यांनी हडपसरमधूनच ५ दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्यांच्याकडून १० गुन्ह्यांची उकल केली असून, ७ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

    चार महिन्यात २८ गुन्ह्यांची उकल

    हडपसर परिसरात गुन्हेगारीचे प्रणाण मोठे असले तरी पोलिसांची कारवाई ही धडकच असल्याचे दिसत आहे. स्थानिक पोलिसांच्या एक पाऊल पुढे अन् क्राईम ब्रँचला देखील लाजवेल अशी कामगिरी सातत्याने हडपसर पोलिसांची होत असून, चार महिन्यात वाहन चोरीचे तब्बल २८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात पोलिसांनी २३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.