सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ला प्रकरणातील फरार दोन आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दोन्ही आरोपीना आज न्यायालयात हजर करणार 

दोन फरार आरोपीना कणकवली पोलिसांनी गुरुवारी पकडले आहे. या दोन फरार आरोपीना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे, धीरज व्यंकटेश जाधव हे दोन आरोपी पुण्यातील असून कणकवली (Kankavli) पोलिसांनी अटक केली आहे.

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. हे प्रकरण राज्यात चांगलंच गाजल होतं. याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह अन्य आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती. पण यातील दोन आरोपी फरार होते, पण या दोन फरार आरोपीना कणकवली पोलिसांनी गुरुवारी पकडले आहे. या दोन फरार आरोपीना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे, धीरज व्यंकटेश जाधव हे दोन आरोपी पुण्यातील असून कणकवली (Kankavli) पोलिसांनी अटक केली आहे.

    दरम्यान, पोलिसांनी त्यांना रितसर अटक करत वैद्यकीय तपासणी केली आहे. या दोघांची प्राथमिक चौकशी केली जात आहे. काल कणकवली पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे, धीरज व्यंकटेश जाधव या दोन आरोपीना अटक केली. त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून प्राथमिक चौकशी कणकवली पोलीस करत आहेत. या प्रकरणात दोन्ही आरोपींना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Central Cooperative Bank) निवडणूक कालावधीतच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. हे प्रकरण राज्यात चांगलंच गाजल होत. तसेच यात आमदार नितशे राणेंना सुद्धा अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एकूण 11 आरोपींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी 2 आरोपींना काल अटक करण्यात आली. अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर करीत आहेत. या दोन फरार आरोपीना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.