मार्केटयार्ड भागात गोळीबार प्रकरणातील दोघांना अटक; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई

मार्केटयार्ड भागातील कुरिअर कंपनीच्या ऑफिसवर भरदिवसा दरोडा टाकून गोळीबार करत २८ लाखांची रोकड चोरी प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आले आहे.

    पुणे : मार्केटयार्ड भागातील कुरिअर कंपनीच्या ऑफिसवर भरदिवसा दरोडा टाकून गोळीबार करत २८ लाखांची रोकड चोरी प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आले आहे. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व काडतूसे जप्त केली असून, गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली आहे. यापुर्वी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.

    संतोष बाळू पवार (वय २३, रा. खानापूर) व साई राजेंद्र कुंभार (वय १९) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानूसार, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे तसेच व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

    संतोष पवार याने पिस्तूल जळगाव येथून विकत आणले असल्याचे तपास समोर आले आहे. त्यानंतर हे पिस्तूल त्याने पिस्तूल साई याच्याकडे ठेवण्यास दिले होते. त्याने एक पिस्तूल यातील अल्पवयीन मुलाला दिले होते. या अल्पवयीन मुलाने कुरिअर कंपनीच्या ऑफिसवर दरोडा टाकताना वापरले. या प्रकरणात गोळीबार करून रोकड लुटली गेली होती. त्यानंतर तिघेही पसार झाले होते. दरम्यान, युनिट तीनच्या पथकाला पिस्तूलाची विल्हेवाट लावण्यासाठी तिघेजन आले असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट निरीक्षक अनिता मोरे तसेच व त्यांच्या पथकाने त्यांना पकडले. अल्पवयीन मुलासह तिघांना पुढील कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलिसांकडे देण्यात आले आहे.