
वाळवा : सांगली जिल्ह्यातील, वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावात अमोल प्रकाश सुतार ( वय वर्ष १६) रा. तांदुळवाडी, ता. वाळवा जि. सांगली. हा सुट्टीनिमित्त आलेला आपला मावस भाऊ रविराज उत्तम सुतार (वय वर्ष १२ ) रा. राजमाची ता. कराड, जि. सातारा याला घेऊन वैरण काढायला नदीला जाऊया असे सांगून ते वारणा नदीकाठाला गेला होता. वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर दोघे भाऊ नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
पोलिसांची तत्काळ कारवाई
या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव. यांच्या सह पोलीस उप निरीक्षक विजय पाटील.पो. काॅ. शंतनू ढवळीकर, पो. काॅ. सचिन मोरे, हवलदार राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. व लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स चे विनायक लांडगे. सुनिल जाधव यांच्या टिमला पाचारण करून या टिमने दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत.
सुटीत आलेल्या मुलांवर काळाचा घाला
रविराज सुतार हा राजमाची. ता. कराड येथील असून तो सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो ७ वि या वर्गात शिकत होता. त्याचे आई वडील हे रोजंदारी करून आपल्या मुलाला वाढवत व शिकवत होते. पण आज त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची व रविराज याच्या घरी शोककळा पसरली आहे .
हाततोंडाला आलेला मुलाचा मृत्यू
अमोल प्रकाश सुतार हा आईवडीलांना एकूलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच असुन हाता तोंडाला आलेला मुलगा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीसात झाली असुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे.