
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये (Bhima River) काही मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुले पाण्यात बुडाल्याची (Drowned in Water) धक्कादायक घटना रविवारी घडली.
शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये (Bhima River) काही मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुले पाण्यात बुडाल्याची (Drowned in Water) धक्कादायक घटना रविवारी घडली. अनुराग विजय मांदळे व गौरव गुरुलिंग स्वामी असे नदीत बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास काही मुले पोहण्यासाठी गेलेले असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुले पोहत असताना दोघा मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुले पाण्यात बुडाली. यावेळी अन्य मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारी शेतात काम करणारे तानाजी ढेरंगे हे नदीकाठी धावत आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांना देताच इतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले होते.
दरम्यान, या शोधमोहिमेत अग्निशमन दलाचीही मदत घ्यावी लागली होती. त्यांनतर पाण्यामध्ये बुडालेल्या दोघा मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत या दोन्ही मुलांचा शोध लागला नाही. दोन मुले पाण्यात बुडाल्याची बातमी गावामध्ये पसरताच नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती. तर घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.