two children drowned in water at kalyan

कल्याणच्या ग्रामीण भागामधील नेवाळी परिसरात डावलपाडा गाव आहे. या गावात एमआयडीसीकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी साचलं होतं. याच परिसरात राहणारा सहा वर्षीय सुरज राजभर व आठ वर्षांचा सनी यादव हे दोघे या ठिकाणी खेळत होते.

कल्याण: कल्याण (Kalyan) ग्रामीणमधील नेवाळी परिसरात पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची (Death By Drowning In Pit) धक्कादायक घटना घडली आहे. सूरज राजभर (Suraj Rajbhar) आणि सनी यादव (Sunny Yadav) अशी या मुलांची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी  कारवाई न केल्याने आज स्थानिक नागरिकानी रस्त्यावर उतरून मुलांचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन रास्ता रोको करत पोलिसांचा निषेध नोंदवला होता. अखेर या प्रकरणी आता ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या ग्रामीण भागामधील नेवाळी परिसरात डावलपाडा गाव आहे. या गावात एमआयडीसीकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी साचलं होतं. याच परिसरात राहणारा सहा वर्षीय सुरज राजभर व आठ वर्षांचा सनी यादव हे दोघे या ठिकाणी खेळत होते. मात्र बराच वेळ झाला मुलं घरी परतली नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी मुलांची शोधाशोध सुरू केली. या दोन्ही मुलांचा मृतदेह पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात आढळून आला.

मुलांचे मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खेळत असताना खेळताना तोल गेल्याने दोघे या खड्ड्यात पडले. या खड्ड्यातील पाण्यात बुडून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने खड्डा खोदला. मात्र त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना का केल्या नाही ? असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तर याबाबत पोलिसांकडून काहीच कारवाई न करण्यात आल्याने या मुलांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आज संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी नेवाळी परिसरात मुलांचे मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको करत प्रशासन व पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला. या प्रकरणी हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजीत ढेरे यांनी सांगितले की या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.

अखेर ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल
रास्ता रोको आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड हे देखील सहभागी झाले होते. अखेर या प्रकरणात अंबरनाथ येथील हिललाईन पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या दोन ठेकेदारांच्या विरोधात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर मसुरकर आणि संतोष पिलगर अशी ठेकेदारांची नावे आहेत.