दोन वर्षे तडीपार असलेल्या दोघांना अटक; कराड डीबी शाखेची कामगिरी

दोन वर्ष तडीपार केलेले असतानाही कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरताना आढळून आलेल्या जखिणवाडी येथील दोघांना कराड शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे.

    कराड : दोन वर्ष तडीपार केलेले असतानाही कराड शहर पोलीस (Karad City Police) ठाण्याच्या हद्दीत वावरताना आढळून आलेल्या जखिणवाडी (Zakhinwadi) येथील दोघांना कराड शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने (DB squad) अटक केली आहे. देवेंद्र ऊर्फ देवा येडगे व पृथ्वीराज बाळासो येडगे (दोघे रा. जखिनवाडी ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयिताची (Karad Crime News) नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 29 जानेवारी रोजी 2 वर्षासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून हद्दपार असतानाही आरोपी देवेंद्र अशोक येडगे हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जखिणवाडी (ता. कराड, जि. सातारा) येथे छुप्या स्वरुपात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांना त्याबाबत माहिती देऊन तात्काळ डी. बी. टीमसह रवाना केले. संशयित आरोपी देवेंद्र ऊर्फ देवा येडगे हा जखिनवाडी गावच्या चौकात बिरोबा मंदीर शेजारी दहशत माजवताना दिसून आला. पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाने पाठलाग करुन सदर आरोपीला अटक केली.

    ही कारवाई कराड शहर पोलिसांतील पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील (कराड शहर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली.