शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोल्हापुरात दोन दिवस अधिवेशन; लोकसभा निवडणुकांची होणार जोरदार मोर्चे बांधणी

    कोल्हापुर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections 2024) तयारी सुरू केली आहे .पदाधिकाऱ्यांचे मजबूत संघटन तयार करणे, प्रादेशिक पातळीवर पक्षाचे कार्यक्षेत्र वाढवणे यासारख्या विविध मुद्द्यांवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन (Shivsena) करणार आहेत सातारा जिल्ह्यातून या अधिवेशनासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे एक हजार सदस्य जाणार असल्याची माहिती आहे. हे अधिवेशन दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले
    महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर कायमच दोन्ही शिवसेनेच्या गटात अंतरविरोध कायम राहिला आहे . न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळालेल्या शिंदे गटाला पक्ष म्हणून सक्रिय ठेवणे कार्यकारणी तसेच घटना निश्चित करणे याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व स्थापित करणे आणि शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात मजबूत संघटन तयार करणे या दोन महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसीय अधिवेशनाचा घाट कोल्हापूरमध्ये घातला आहे
    या अधिवेशनाला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे तसेच कोल्हापूर व कोकण विभागातील बिनीचे शिंदे समर्थक उपस्थित राहणार आहेत . सातारा जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख कार्यकारणी सदस्य संपर्कप्रमुख सुमारे 1000 कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये गोपनीयता बाळगली जात आहे .
    आगामी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटाने अधिवेशनाची रणनीती आखली आहे. या अधिवेशनामध्ये संघटनेची कार्यकारिणी निश्चित असली तरी अंतर्गत जबाबदाऱ्यांचे वाटप अध्याप झालेले नाही ते महत्त्वपूर्ण काम करण्यात येणार आहे. भाजपने सातारा, माढा आणि बारामती या तीन लोकसभा मतदार संघाच्या लढती प्रतिष्ठेच्या केलेले आहेत. महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिंदे गट ही यामध्ये सक्रिय राहणार आहे. पण शिंदे गटाचे तळागाळात राजकीय संघटन मजबूत करणे, आक्रमक रणनीतीचे कार्यकर्ते शोधणे आणि त्यांना ताकद देणे या विषयावर राजकीय खल करण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदे गट कोणत्या जागांवर दावा सांगू शकतो याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिवेशनाची गोष्ट कबूल केली तरी कार्यकारणीचे ठराव कोणते असणार या विषयावर बोलण्यास नकार दिला . मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने शिंदे गट आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे त्या दोन दिवसात कोल्हापुरात कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडणार याची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चितच उत्सुकता आहे