Two dead bodies were found lying in the tunnel of the Nadi Joad project

    इंदापूर : इंदापूर तालुक्यात नदी जोड प्रकल्पाअंतर्गत खोदण्यात आलेल्या निरा भिमा बोगद्यात काझड (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत शाफ्ट नंबर चार मध्ये पडलेल्या दोन शेतकऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.रतिलाल बलभीम नरुटे,अनिल बापूराव नरुटे अशी मयत झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत.
    दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह अखेर हाती लागले
    इंदापूर तालुक्यातील काझड व अकोले गावच्या सीमेवर असलेल्या जलस्थिरीकरणाच्या सुमारे ३०० फूट खोल बोगद्यात दोन शेतकरी कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२२) संध्याकाळी घडली होती.रात्री उशीरापर्यंत स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु होती. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह अखेर हाती लागले.
    एका ओपन स्पेसमधून हे शेतकरी बोगद्यात
    लाकडी कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ओपन स्पेसमधून हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते. बऱ्याच वेळानंतरही दोघेही घरी परतले नाहीत. त्यावेळी नातेवाईकांसह स्थानिकांनी घटनास्थळ गाठले आणि त्यांचा शोध सुरु केला. मात्र घटनास्थळी दोघांची मोटार सायकल सापडल्याने काहीतरी घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक शोधाशोध केली असता दोघेही बोगद्याच्या आत कोसळ्याचे समोर आले होते.