malvan boat

मालवणमधील (Malvan Boat Accident) तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली आहे.

    सिंधुदुर्ग: मालवणमधून (Malvan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवणमध्ये जय गजानन बोट बुडाली असून या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू (Two Death In Boat Accident) झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली आहे. साधारण २० पर्यटक घेऊन स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असताना बोट बुडाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा पर्यटकांना मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बोटीतील इतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे.

    प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोटीची प्रवासी क्षमता किती होती, या सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते का हेदेखील तपासले जात आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्घटनेत कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर चालक आणि मालकावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

    दरम्यान अपघातामधील पर्यटक हे मुंबई आणि पुण्याचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. साडेबारा वाजून गेले होते. समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या लाटांपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु होता. बोट एका बाजूने कलंडली. बोट दोन तीन वेळा फिरली. लाटांमुळे बोट खाली दबली जात होता. याचवेळी अनेकांच्या नाका-तोंडात पाणी गेलं, अशी माहिती बोटीतील प्रत्यक्षदर्शी पर्यटकाने दिली.