अत्यंविधीसाठी निघालेल्यांवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ, अपघातात दोघांचा मृत्यू तर 15 जखमी

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघाता सासू आणि जावई यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.

    नांदेड : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्यावरच आता अंत्यसंस्कार करण्याची दुर्देवी वेळ त्यांच्या कुटुंबियांवरच आली आहे. नांदेडमध्ये नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या एका कुटुंबियाच्या गाडीचा भीषण अपघात (Nanded Accident News) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात सासू आणि जावयाचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहे.

    एका नातेवाईकाचे निधन झाल्याने हैदराबाद येथील कुटुंबिय हे सर्व जण चारचाकीने (Car accident) नांदेडच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नांदेड- हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ गाडीचे समोरील टायर फुटल्याने जीप उलटली. या अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख महेबूब बाबू शेख (40) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (55) अशी त्यांची नावं आहेत. तर या अपघातामध्ये पिरसाब नवाबसाब शेख (65,गोनेगाव), खाजा मगदूम शेख (45), फरजना खाजा शेख (40, देगाव), खुदबोद्दीन नवाज साब (60 देगाव), घाशी साब बाबूसाब शेख (55, चालक, गोनेगाव ), शादुल बाबूसाब शेख (45, गोनेगाव) , आजमिर महेबूब शेख (40, गोनेगाव), खाजा साब मौलासाब शेख (45), हैदर इस्माईल साब शेख (40, गोनेगाव) हे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य सात जण या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातीमधील सर्व जखमींवर सध्या नादेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.