डीजेच्या दणदणाटाने हृदयाचा घात, सांगलीत दोन तरुणांचा मृत्यू, एकाची 10 दिवसापुर्वीच झाली होती अँजिओप्लास्टी!

सांगलीत वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. दोघंही सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी ह गेले होते. मात्र, डीजेच्या दणदणाटाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला.

    सांगली : आजकाल तरुणांमध्ये हृदयविकारचं (Heart attack) प्रमाण वाढत असल्याचंं दिसत असताना  सांगलीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सांगलीमध्ये (Sangli News) दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला.हे दोन्ही तरुण त्यांच्य  घराजवळील परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला आले होते. मात्र, डिजेच्या दणदणटानं दोघांही अस्वस्थ वाटायला लागलं. शेखर पावशे (वय 32,)  आणि प्रवीण शिरतोडे (वय 35) अशी दोन्ही तरुणांची नावं आहेत.

    पहिली घटना

    सांगलीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला आहे. पहिली घटना तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधे घडली.  दुधारी येथील प्रवीण शिरतोडे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास कामावरून घरी परतत होता. वाटेच त्याचीदुचाकी बंद पडली. बरंच अंतर दुचाकी ढकलत घरी आणली. घरी पोहचल्यानंतर तो परिसरातील मंडळाची मिरवणूकीत नाचायला गेला. मात्र,  आधीच दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ होऊ लागले. नाचताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    दुसरी घटना

    तरुणाच्या मृत्यूची दुसरी घटना कवठेएकंदमधील येथे घडली. शेखर पावशे हा तरुण परिसरात निघालेली गणेश मंडळाची मिरवणूक बघण्यासाठी गेला. मात्र,  मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. ऐन उत्सवाच्या वातावरणात उमद्या शेखरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  शेखर पावशेचा पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीत तरुणाचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.