कोकणातील शिवसेनेचे दोन माजी मंत्री, आमदार भाजपाच्या संपर्कात! आशिष शेलार, प्रसाद लाड, नारायण राणेंवर शिवसेना पाडण्याची जबाबदारी

नाणार रिफायनरीवरून कोकणात सध्या राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. नाणारवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतल्याने आधीच स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. याचा फायदा घेत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्याची रणनीती भाजपाने आखली असल्याचे समजते(Two former Shiv Sena ministers and MLAs from Konkan in touch with BJP! Ashish Shelar, Prasad Lad, Narayan Rane are responsible for bringing down Shiv Sena).

    रत्नागिरी : नाणार रिफायनरीवरून कोकणात सध्या राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. नाणारवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतल्याने आधीच स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. याचा फायदा घेत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्याची रणनीती भाजपाने आखली असल्याचे समजते(Two former Shiv Sena ministers and MLAs from Konkan in touch with BJP! Ashish Shelar, Prasad Lad, Narayan Rane are responsible for bringing down Shiv Sena).

    याची जबाबदारी आशिष शेलार, प्रसाद लाड, नारायण राणे , निलेश राणे यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांचे कोकणात दौरे, कार्यक्रमही सुरू झाले आहेत. नाणार रिफायनरीवरून आरोप-पत्यारोप सुरु असतानाच दोन माजी मंत्री आणि एक आमदार भाजपाच्या संर्पकात असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत नाराजी आहे.

    बालेकिल्ल्याला लावणार सुरुंग

    कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक पाहता भाजपाने मेगा प्लॅन तयार केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्यानंतर कोकण हाती घेण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपा सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहे.

    रिफायनरीचा मार्ग मोकळा!

    मुख्यमंत्री ठाकरे यांनी धोपेश्‍वर-बारसू भागात रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य शासन अनुकूल असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारीतच दिले होते. भाजपाचे पूर्वीपासूनच रिफायनरीला समर्थन आहे. त्यामुळे राजापुरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचे भाजपकडून बोलेल जात आहे.