धोम धरणाचे दोन दरवाजे उघडले, कृष्णा नदीला पूर

ओम धरण पूर्ण क्षमतेने भरले असून शनिवारी दुपारी मनाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. कृष्णा नदीपात्रात २१४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून यामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे.

    वाई : बलकवडी धरणापाठोपाठ ओम धरण ही पूर्ण क्षमतेने भरले असून शनिवारी दुपारी मनाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. कृष्णा नदीपात्रात २१४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून यामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. धूम पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास अजून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    गेली दोन आठवडे दोन धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पानिपतळीत कमालीची वाढ झाली आहे. शिवाय बलकवडी धरणातूनही पाण्याचा फ्लो धरणामध्ये येत असल्याने धरण ९० टक्के भरले आहे. धरणाची निर्धारित पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी शनिवारी दुपारी धरणाचे एक व पाच हे दोन वक्र दरवाजे ०. ४० मीटरने उघडण्यात आले असून कृष्णा नदी पात्रात २१४७ कुसेक पाण्याचा विसर्ग आला आहे. सध्या धरणात ९१ टक्के पाणीसाठा आहे. कृष्णा नदी पात्रात पाणी सोडल्याने कृष्णला पूर आला आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

    दरम्यान धोम व बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने वाई तालुक्याच्या पूर्व भागासह खंडाळा, कोरेगाव, फलटण, सातारा, या तालुक्यातील दुष्काळी भागाचा शेती पाण्याचा प्रश्न मिटला आहे. एक आनंदाचीच वार्ता आहे.