पुणे महानगरपालिका
पुणे महानगरपालिका

आत्पाकालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील तीन वर्षांत हा निधी टप्प्या-टप्प्याने महापालिकेला मिळणार आहे.

    पुणे : आत्पाकालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील तीन वर्षांत हा निधी टप्प्या-टप्प्याने महापालिकेला मिळणार आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी दिली.

    केंद्र सरकारकडून आत्पकालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जात आहे. त्यानुसार पुणे महापालिकेला सुमारे अडीचशे कोटी रुपये मिळणार आहेत. हा निधी मिळविण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारला पाठविला होता. केंद्र सरकारने मात्र, प्रस्तावाला काही सूचना करत महापालिकेला फेर प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, महापालिका अभ्यास करून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कामे निश्चित करून फेर प्रस्ताव पाठविले होते.

    अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती पुण्यात यापूर्वी घडल्या आहेत. यामुळे नागरी भागात पाणी शिरुन जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यापार्श्वभूमीवर अतिवृष्टी झाल्यानंतर पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी गटारे निर्माण करणे, पाईप लाईन टाकणे, तसेच डोंगर उतारावर पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी चर खोदणे, तलावातील गाळ काढणे आदी कामांचा यात समावेश आहे. तसेच एक नियंत्रण कक्ष तयार करणे या कामासाठी ही निधी वापरण्यात येणार आहे.