पाचोरा-भडगाव येथे दुचाकी अपघातात दोघे ठार; मध्यरात्रीची घटना

रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान अंकीत काॅटन जिनिंग जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील गोपाल पुजारी हे जागीच ठार झाले.

    पाचोरा : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागेवरच ठार झाला तर एकाचा जळगांव (Jalgaon) येथे उपचारा दरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना भडगाव रोडवरील अंकीत कॉटन जिनिंग (Ankit Cotton Ginning) जवळ घडली आहे.

    गोपाल गोवर्धन पुजारी (वय – ४०) रा. बाहेरपुरा, पाचोरा व खुशाल अर्जुन सोनार (वय – २५) रा. संभाजी नगर, पाचोरा हे २८ रोजी आमडदे ता. भडगाव येथे यात्रेत व्यवसायासाठी जागा सांभाळण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी आमडदे येथे गेले होते. २७ रोजी रात्री उशिरा आमडदे येथुन मोटरसायकलने पाचोरा येथे येण्यासाठी निघाले.

    दरम्यान रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान अंकीत काॅटन जिनिंग जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील गोपाल पुजारी हे जागीच ठार झाले तर खुशाल सोनार हा गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता खुशाल सोनार याचा २८ रोजी मृत्यू झाला.

    मयत गोपाल पुजारी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी व एक बहिण तर खुशाल सोनार याचे पाश्चात्य आई, वडील, बहिण असा परिवार असून गोपाल पुजारी व खुशाल सोनार हे परिवारातील एकुलते एक कर्ते असल्याने पुजारी व सोनार परिवारावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.