राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचं काम सोसायटी मासिक गेनी अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यासह मुंबईत २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरु आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

    मुंबई : समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या हस्ते ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ (Society Achievers Award) देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर, अभिनेत्री हेमा मालिनी, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेता अनुपम खेर, सोनू सूद, सिद्धार्थ मल्होत्रा (Meenatai Khadikar, Hema Malini, Dilip Vengsarkar, Anupam Kher, Sonu Sood) आदी मान्यवरांसह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती अमृता फडणवीस यांना सोसायटी अचिव्हर्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये रविवारी हा पुरस्कार सोहळा झाला. यावेळी मॅग्ना प्रकाशन समूहाचे अध्यक्ष नारी हिरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचं काम सोसायटी मासिक गेनी अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यासह मुंबईत २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

    यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवूया असे आवाहन त्यांनी केले. विविध क्षेत्रात राज्याचं आणि देशाचं नाव उज्वल करणाऱ्या मान्यवरांचा आज गौरव झाला आहे. सोसायटी मासिकाने सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार सुरू केल्यास तो घ्यायला आम्ही नक्की येवू असेही ते म्हणाले.