सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी ‘या दोन मंत्र्यांची’ झाली नियुक्ती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय

आज मुंबईतील सहयाद्री अतिथीगृह येथे सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांवर जबाबदारी दिल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) या दोघांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील समस्या  सोडविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

    मुंबई : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यानंतर देखील आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. बेळगाव, कारवार, निपाणी (Belgaum, Karwar, Nipani) आदी सीमा भागात कन्नड भाषिक व मराठी भाषिक यांच्यात वरचेवर वादाची ठिणगी पडत असते. त्यामुळं दोन्ही राज्यातील अस्मिता जागृत होऊन येथे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद किंवा हाणामारी घडत असते. सरकारं आली आणि गेली पण सीमा भागातील प्रश्न त्यांना अद्यापर्यंत सोडवता आला नाहीय, मात्र आता सीमा प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुढाकार घेतला आहे.

    दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सहयाद्री अतिथीगृह येथे सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांवर जबाबदारी दिल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) या दोघांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील समस्या  सोडविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असा निर्णय मुंबईत पार पडलेल्या उच्चस्तरिय बैठकीत घेण्यात आला आहे.

    त्यामुळं आता तरी सीमा भागातील प्रश्न मार्गी लागणार का? किंवा सीमा भागात जे मराठी माणसांवर अन्याय होतो, त्याला न्याय मिळणार का? हे पाहवे लागणार आहे. मुंबईत पार पडलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आदी नेते व मंत्री उपस्थित होते.