शिंदे गटाच्या दोघांची केंद्रीय मंत्रिमंडळात लागणार वर्णी?; ‘ही’ नावं चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. राज्यातील मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याबाबत आता मोठ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. राज्यातील मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याबाबत आता मोठ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

    राज्यातील मंत्रिमंडळाबरोबरच शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात देखील संधी मिळणार आहे. शिंदे गटाला केंद्रातून २ मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही मंत्रिपदासाठी दोन नावे चर्चेत आहेत. हि दोन्ही नावे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. शिंदे गटाकडून केंद्रात मंत्रिपदासाठी दीपक केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे हि दोन नावे सध्या चर्चेत आहे.

    दरम्यान, आज रात्री शिेंदे गट मुंबईत दाखल होणार आहे. गोव्याहून त्यांना मुंबईतील ताज प्रेसिडेंसी हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. कारण या बंडखोर आमदारांविषयी शिवसैनिकांच्या मनात प्रचंड राग आणि संताप आहे. त्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे.