मुंबई लोकलमधून तोल जाऊन एकाच आठवड्यात डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू

मुंबई लोकल ही मुंबईकरांची (Mumbai Local) लाईफलाईन आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलच्या गर्दीमध्ये प्रवास करत असताना आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    मुंबई लोकल ही मुंबईकरांची (Mumbai Local) लाईफलाईन आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलच्या गर्दीमध्ये प्रवास करत असताना आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका आठवड्यात लोकलने प्रवास करत असताना डोंबिवलीतील दोघांचा ट्रेनमधून तोल जाऊन मृत्यू झाला आहे. हे दोघंही डोंबिवलीतील रहिवासी आहेत. सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबईला कामाला जात असताना कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रिया राजगोर या तरुणीचा मृत्यू झाला तर २३ तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा ट्रेनमधून तोल जाऊन डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान मृत्यू झाला. रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.

    डोंबिवलीमधून मुंबईच्या दिशेने कामासाठी जाणाऱ्या रिया राजगोर हीच रेल्वेमधून पडून मृत्यू झाल्यानंतर लगेच दोन दिवसाने अवधेश दुबे या तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वेमधून तोल जाऊन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रिया राजगोर ही कामासाठी मुंबईमध्ये यायची. मात्र सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये रिया चढली. ट्रेनला जास्त गर्दी असल्यामुळे रिया दरवाज्यावर उभी राहिली होती. लोकलमध्ये गर्दी वाढत गेल्यानंतर रियाचा कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तोल गेला आणि त्यानंतर ती खाली पडली. त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला.

    डोंबिवलीमधून प्रवास करणाऱ्या अवधेश दुबेचा देखील मृत्यू ट्रेनमधून तोल जाऊन झाला. मुंबईला कामासाठी जाणारा अवधेश नेहमीप्रमाणे २३ तारखेला सकाळी डोंबिवलीतून मुंबईला जाण्यासाठी निघाला. लोकलमध्ये गर्दी असल्याने त्याचा डोंबिवली ते मुंब्रा स्थानकादरम्यान त्याचा तोल जाऊन मृत्यू झाला. काही दिवसांआधी अवधेशचा भाऊ दीपक दुबे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रेल्वेमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना लोकल वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भावाचा ट्रेनमध्ये पडून मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.कल्याण डोंबिवलीहुन कामाला येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.