नाशिक शहर परिसरात विष पिऊन दोघांची आत्महत्या; आत्महत्येचे कारण…

शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी (दि.4) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले. त्यात एका महिलेचा समावेश आहे.

    नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले. त्यात एका महिलेचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा बाळू शिंदे (वय 44, रा. इंद्रनगरी) या महिलेने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास डॉ. आशिष शिरोडकर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

    याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करत आहेत. तर दुसरी घटना कॅनलरोड भागात घडली. रोहित रमेश उदावंत (वय 40, रा. रू द्राक्ष अपा. चंपानगरी) यांनी रविवारी (दि.3) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते.