
बहुचर्चीत जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दोन लिपिकांना निलंबीत केले आहे.
सोलापूर : बहुचर्चीत जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दोन लिपिकांना निलंबीत केले आहे.
अनिल पाटील, शामसुंदर समदुरले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सांडपाणी घनकचरा निविदा प्रक्रियेत अनियमितता, दफ्तर दिरंगाईचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कडक शिस्तीच्या म्हणून ओळख असणाऱ्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी धडाकेबाज कामगिरीला सुरूवात केली आहे. जलजीवन मिशनच्या कामकाजावर विशेष लक्ष त्यांनी केंद्रीत केले आहे. दरम्यानच्या काळात मनीषा आव्हाळे यांना प्रभारी सीईओपदी कार्यरत असताना जलजीवनची प्रलंबित कामे युद्धपातळीवर मार्गी लावली.
अनिल पाटील आणि शामसुंदर ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. अनिल पाटील बदलीने शिक्षण (माध्यमिक) तर समदुरले बांधकाम विभागात कार्यरत आहेत.
आरोपावर चौकशी समिती
जलजीवनच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन सभेत आमदार सुभाष देशमुख यांनी केला होता. या आरोपावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीचा चौकशी आहवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहासमोर मांडला होता. कामकाजात अनियमिता झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता.