पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक, एका व्यक्तीजवळ आढळली घातक शस्त्र

स्वत: सैन्य दलातील सैनिक असल्याची बतावणी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी बीकेसी (BKC) एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान मोदींची ( PM Narendra Modi) जाहीर सभा झाली. सैन्य दलातील सैनिक असल्याची बतावणी करुन सभास्थळी घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तर, यावेळी संशयीत रित्या परिसरात फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांना घातक शस्त्र आढळली आहे.

    नेमकं काय घडल?

    दोन दिवसापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत मेट्रोसह विविध प्रकल्पाचं उद्घाटन केलं. यावेळी परिसरात कडक बंदोबंस्त करण्यात आला होता. पोलिसांकडून परिसकातील सुरक्षा व्यवस्ठा चोख ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी, संशयास्पद रित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातून घेतल. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या परिसरातून दोघांना अटक केली आहे. यापैकी एका व्यक्तीकडे घातक शस्त्र आढळल्याने खळबळ उडाली आहे. कटराम चंद्रगाई कावड असं या आरोपीचं नाव असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 39 वर्षीय कटराम हा हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचा कर्मचारी असून तो भिवंडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

    सैनिक असल्याची बतावणी करुन सभेत घुसण्याचा प्रकत्न

    स्वत: सैन्य दलातील सैनिक असल्याची बतावणी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे पोहोचण्यापूर्वी सुमारे 90 मिनिटांपूर्वी नवी मुंबईतील एका 35 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर, अशाच आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.