चेंबूरमध्ये दरड कोसळून दोनजण गंभीर जखमी

दरड कोसळल्यानंतर एक मोठा दगड प्रजापती कुटुंबीयांच्या घरात घुसला. यात हे दोघे भाऊ जखमी झाले असून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

    चेंबूरमध्ये (Chembur) आज पहाटे चारच्या सुमारास झोपडीवर (Hut) दरड कोसळून (Landslide) दोन जण गंभीर (Injured) जखमी झाले आहेत. या घटनेत झोपडीतील अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. चेंबूरच्या न्यू भारतनगरमध्ये (New Bharat Nagar) सकाळी ही घटना घडली आहे. या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    चेंबूरमधील झोपडीवर दरड कोसळलेल्या घटनेत दोन भाऊ जखमी झाले आहेत. चेंबूर येथील ही झोपडपट्टी डोंगरी पट्ट्यात येते. याआधीही या विभागात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात म्हणून याअगोदरही प्रशासनाने नागरिकांना येथून स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.

    आता मुंबईमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनेत दरड कोसळल्यानंतर एक मोठा दगड प्रजापती कुटुंबीयांच्या घरात घुसला. यात हे दोघे भाऊ जखमी झाले असून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.