पुणे-नाशिक महामार्गावर मक्याचे कणसं घेवून जाणारा टेंपो उलटला, दोन जण जखमी

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे.

    अहमदनगर : संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मकांची कणसे घेवून जाणारा टेंपो उलटला असून दोन जण जखमी झाले आहे. तर, टेंपो उलटल्याने कणसं महामार्गावर पडल्या होत्या. त्यामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. टेंपो चालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि आर्जुन युवराज गव्हाणे असी जखमींची नावं आहेत.

    हे कन्नड येथून १२० मकाच्या कणसांच्या गोण्या घेवून संगमनेर मार्गै चाकणला जात होते. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले होते. त्यावेळी टेंपो उलटला त्यामुळे कणसांच्या गोण्या महामार्गावर पडल्या होत्या. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे.