Two sentenced to 20 years hard labor for indecent act on 4-year-old minor girl

२२ एप्रिल २०१९ रोजी आरोपी राहुल पिस्तुलकर हा पीडित मुलाच्या घरी येऊन पीडितेस ( वय ०४ वर्षे) भिंगरी घेऊन देतो, म्हणून घेऊन गेला. जवळील मंदिराच्या मागे नेले तिथे त्याच्यासोबत इतर दोन आरोपी होते. त्यांनी पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर चाँकलेट देवून घरी सोडून दिले.

    वर्धा : अल्पवयीन मुलावर (Minor Girl) अनैसर्गिक कृत्य (Unnatural act) करणाऱ्या आरोपींना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा (Punishment of hard labour) व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश मो. ई. आरलैंड यांनी दिला.

    आरोपीचे नाव राहुल राजाभाऊ पिस्तुलकर, आदित्य उर्फ शुभम मनोहरराव येवले दोन्ही रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी वार्ड नं. ९ जुना पुलगाव असे आहे. आरोपींना कलम ३ व ५ चे अंतर्गत कलम ४ (२) व ६ बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Child Sex Act) प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकाला अतिरिक्त सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा खालील केलेल्या कृत्याकरीता ठोठवण्यात आली आहे.

    घटनेची हकिकत अशी की, २२ एप्रिल २०१९ रोजी आरोपी राहुल पिस्तुलकर हा पीडित मुलाच्या घरी येऊन पीडितास ( वय ०४ वर्षे) भिंगरी घेऊन देतो, म्हणून घेऊन गेला. जवळील मंदिराच्या मागे नेले तिथे त्याच्यासोबत इतर दोन आरोपी होते. त्यांनी पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर त्याला चाँकलेट देवून घरी सोडून दिले.

    सदरची घटना पीडिताने दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडिताने आरोपीला ओळखल्यानंतर त्याला पकडून पुलगाव पोलीस ठाण्यात रिपोर्ट (Report at Pulgaon Police Station) दिली. प्रकरण संपूर्ण चौकशी अंती तपासी अधिकारी सोमनाथ टापरे यांनी गुन्हा नोंद केला. आरोपीतांनी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील गिरीष व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले व सदर प्रकरणात सरकारतर्फे एकूण दहा साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरिक्षक अनंत रिंगणे पुलगांव यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली. पीडित व इतर सर्व साक्षदार, सरकारी वकील यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा न्यायाधीश  -१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश मो. ई. आरलैंड यांनी आरोपीस ११ आँगस्टला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.