संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

लखमापूर फाट्यावरील शॉर्ट सर्किटमुळे जगदंबा हार्डवेअर व जगदंबा किराणा ही दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुपारी दोनच्या सुमारास लागलेली आग उशिरापर्यंत आटोक्यात आणण्याचे काम सुरू हाते.

    बाणी : लखमापूर फाट्यावरील शॉर्ट सर्किटमुळे जगदंबा हार्डवेअर व जगदंबा किराणा ही दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुपारी दोनच्या सुमारास लागलेली आग उशिरापर्यंत आटोक्यात आणण्याचे काम सुरू हाते. याबाबत अधिक माहिती अशी की, लखमापूर-परमोरी रस्त्यावरील जगदंबा हार्डवेअर व जगदंबा किराणा या दोन दुकानांना दुपारी दोनच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली.

    ललीत हिरण (रा. वरखेडा, ता. दिंडोरी) यांच्या मालकीचे ही दुकाने असून, दुपारच्या सुमारास जेवायला जात असताना दुकानात शॉर्ट सर्किट झाले व आग लागली. अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत दुकानातील बहुतांश वस्तू जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन वाहनांचे पाणी संपल्याने पुन्हा पाणी भरुन येईपर्यंत आगीने रौद्र स्वरुप धारण केले होते. आगीचे वृत्त समजताच विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने दोन फिडरचा विद्युत पुरवठा बंद केला. या दुकानातील वायर्स प्रमुख वाहिनीमधून काढून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

    या आगीचे वृत्त समजताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेत जगदंबा फर्निचर या दुकानाचेही किरकोळ नुकसान झाले. व्यावसायिकांनी दुकानातील वायरिंगची तपासणी वेळोवेळी करुन घ्यावी, जेणेकरुन असे धोके टळतील, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत यांनी दिली.