नाशिकमधील वेगवेगळ्या भागांत दोघांच्या आत्महत्या; एकाने इमारतीवरून उडी मारली तर दुसऱ्याने…

शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, रविवारी (दि.२८) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने आपल्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तर दुसऱ्याने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले.

    नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, रविवारी (दि.२८) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने आपल्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तर दुसऱ्याने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी अशोक शिंपी (३०, रा. उमा पॅलेस, प्राची हॉटेलच्या बाजूला ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास मद्याच्या नशेत अज्ञात कारणातून आपल्या राहत्या तीन मजली इमारतीवरून ऊडी घेतली होती. या घटनेत त्यांच्या छातीस व पायास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले.

    याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार गारले करत आहेत. दुसरी घटना शिवशक्ती चौकात घडली. शादीकुल रहेमान शेख (२३, रा. चंद्रमा रो बंगलो, शिवशक्तीचौक) या युवकाने रविवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून किचनमधील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियाने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले.