Two truckloads of artillery shells and five artillery pieces were found during the clean-up operation at Latur fort

लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या किल्ल्याची स्वच्छता करताना किल्ल्यात एका बुरुजाखालील गुहेत जवळपास दोन ट्रक तोफगोळे, पाच तोफा सापडल्या आहेत. या शिवकालीन ठेव्याचं जतन केलं पाहिजे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे(Two truckloads of artillery shells and five artillery pieces were found during the clean-up operation at Latur fort).

  लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या किल्ल्याची स्वच्छता करताना किल्ल्यात एका बुरुजाखालील गुहेत जवळपास दोन ट्रक तोफगोळे, पाच तोफा सापडल्या आहेत. या शिवकालीन ठेव्याचं जतन केलं पाहिजे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे(Two truckloads of artillery shells and five artillery pieces were found during the clean-up operation at Latur fort).

  स्वखर्चाने सुरू होती स्वच्छता मोहीम

  हिंदू साम्राज्य महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सावळे, सोलापूरचे किशोर माने, औरंगाबादचे दत्तू हाडोळे, उस्मानाबादचे नागेश जाधव यांच्यासह राज्याच्या २६ जिल्ह्यांतील ८० जणांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून लातूरमधील उदगीरच्या किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पथकाने स्वखर्चाने उदगीरला येऊन किल्ल्यातील भिंतीवर वाढलेली झुडपे, विहिरींतील गाळ काढणे, गुहा स्वच्छ करणे आदी कामे सुरू केली आहेत.

  साहित्य व किल्ल्याचे जतन करण्याची मागणी

  उदगीरच्या किल्ल्यातील बुरुजाखालील गुहेमध्ये दोन ट्रकहून अधिक शिवकालीन तोफगोळे सापडले आहेत. त्यामुळे इतिहास अभ्यासकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोमवारी किल्ल्यातील गुहेची स्वच्छता सुरू असताना सापडलेले तोफगोळे आणि तोफा आणि या किल्ल्याचे जतन करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

  अभ्यासकांची उत्सुकता वाढली

  इसवी सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी आपले सैन्य घेऊन मैदान गाजवले. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीरपासून झाल्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. या किल्ल्यात साठवून ठेवलेले तोफगोळे हे चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील असावेत, असा अंदाज या पथकाचे प्रमुख शिवाजी पवार यांनी वर्तवला आहे. उदगीरच्या किल्ल्यातील गुहेची स्वच्छता सुरू असताना दोन ट्रकहून अधिक शिवकालीन तोफगोळ्याचा साठा सापडला आहे. त्यामुळे अभ्यासकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  पुरातत्व खाते व सरकारची उदासिनता

  उदगीर किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. राज्यातील अन्य गडकिल्ल्यांचीही तशीच अवस्था आहे. शिवप्रेमी या ठिकाणी येऊन स्वच्छता आणि संवर्धन करण्याचे काम करतात. मात्र, संवर्धनासाठी आलेल्या शिवप्रेमी आणि शिवभक्तांची अडवणूक केली जाते. त्यांना परवानगी दिली जात नाही. सरकार, लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व खाते गडकिल्ल्यांकडे लक्ष देत नाहीत, असे शिवाजी पवार म्हणाले.