tractor accident

चार मजूर एका ट्रॅक्टरवर बसले होते. ते दुसरीकडे सिमेंटचे खांब पोहचवण्यासाठी जात होते. रस्त्यात ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं. ट्रॅक्टर उलटल्याने चार जण ट्रॅक्टरखाली दबले गेले.

  चंद्रपूर: मजुरांना थंडी, ऊन किंवा पाऊस असला तरी प्रत्येक परिस्थितीत काम करावं लागतं. सध्या विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच भडकला. दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत काम उरकून घेण्याचा बरेच जण प्रयत्न करतात. दुपारी चारनंतर थोडा उन्हाचा पारा कमी झाल्यावर पुन्हा कामाला लागतात. तर काही जणांना दुपारीदेखील काम करावं लागलं.(Marathi News) सिमेंटपासून खांब तयार केले जातात. हे खांब घराच्या किंवा शेतीच्या कंपाऊंडसाठी वापरतात. हे खांबच दोन मजुरांच्या जीवावर उठले.(Chandrapur News)

  चार मजूर एका ट्रॅक्टरवर (Chandrapur Tractor Accident) बसले होते. ते दुसरीकडे सिमेंटचे खांब पोहचवण्यासाठी जात होते. रस्त्यात ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं. ट्रॅक्टर उलटल्याने चार जण ट्रॅक्टरखाली दबले गेले. त्यापैकी दोघांचा अपघाताच्या ठिकाणीच जीव गेला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मूल तालुक्यातील पिपरी-दीक्षित येथे घडली.

  जिल्ह्यात सिमेंटचे खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. मिथुन मराठे (वय 35) आणि अंकित गंडेशिवार (वय 30) अशी मृतकांची नावं आहेत.

  केळझर येथील रहिवासी
  मृत व्यक्ती आणि जखमी हे सर्व मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत. केळझर येथून चिंचाळा येथे सिमेंट खांब नेत असताना पिपरी-दीक्षित येथे वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. यात सिमेंट खांब अंगावर पडून 2 जण जागीच दगावले. जखमींना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
  हे दोन्ही मजूर पोटापाण्यासाठी कामाला गेले होते. त्यावर त्यांची उपजीविका चालत होती. पण, आता अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवा दुःखाचे डोंगर कोसळले आहे. कुटुंबीयांचे पालनपोषण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.