Two young women drowned in a reservoir while trying to save one

दोघीही सहलीसाठी कारंजा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अडान प्रकल्पावर गेल्या होत्या. दरम्यान, दोघीपैकी एकीचा अचानक पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी तरुण मुलगीही पाण्यात बुडाली. काही अंतरावर असलेल्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींनाही पाण्याबाहेर काढले.

    कारंजा : सहलीसाठी गेलेल्या दोन तरुण मुलींचा रामनगर (पिंप्री फॉरेस्ट) येथील अडाण जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सफिया नासिर अली (१८) व उजमा अनिस अन्सारी (१८) दोघीही (रा. दाईपुरा कारंजा) अशी मृत युवतींची नावे आहेत. एकीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीनेही आपले प्राण गमावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    प्राप्त माहितीनुसार, उपरोक्त दोघीही सहलीसाठी कारंजा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अडान प्रकल्पावर गेल्या होत्या. दरम्यान, दोघीपैकी एकीचा अचानक पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी तरुण मुलगीही पाण्यात बुडाली. काही अंतरावर असलेल्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींनाही पाण्याबाहेर काढले. परंतु, तो पर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंधर करीत आहे.