अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुरवडी गाव येथे तळेगाव चाकण रोडवर घडला आहे.याप्रकरणी अनिल शंकर परदेशी (वय ३३, रा. महाळुंगे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाकण : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुरवडी गाव येथे तळेगाव चाकण रोडवर घडला आहे.याप्रकरणी अनिल शंकर परदेशी (वय ३३, रा. महाळुंगे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामसिंग परदेशी (वय २७) व रिंकू शारदा सिंग (वय २०) अशी अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ गणेश हा त्याचा मित्र रिंकू यासह दुचाकीवरून चाकण तळेगाव रोडवरून जात होता. यावेळी सुधा पूलाजवळ ते आले असतात पाठीमागून आलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे खाली पडले.

    त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना इतरांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले; मात्र दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी धडक देणारा वाहनचालक तेथे न थांबता तेथून पसार झाला. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.