typical answers of the official class on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभी केली जात आहे. चाळ वजा लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्य़ात पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवतो. नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. त्यावर अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत (KDMC Area) नागरीकरण होत असल्याने पाण्याची समस्या उद्धवते (Water Issue). पाणी टंचाई विषयी (Water Shortage) लोकप्रतिनिधी या नात्याने नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. मात्र अधिकारी वर्गाकडून (Officials) ठराविक उत्तरे देऊन नागरीकांची बोळवण केली जात असल्याचा मुद्दा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे (Kalyan MLA Vishwanath Bhoir has presented it in the Legislative Assembly). तसेच कल्याणसाठी पाणी पुरवठा योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे (Water Supply Scheme Demand to State Government).

कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभी केली जात आहे. चाळ वजा लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्य़ात पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवतो. नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. त्यावर अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पंपिंग स्टेशन बंद आहे. लाईट गेली होती. दुरुस्तीचे काम घेतले आहे अशी ठराविक उत्तरे दिली जातात.

मागच्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळीही त्यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठयाची योजना अथवा धरण उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी काळू धरणातील पाणी कल्याणसाठी आरक्षित केले जाईल असे सांगितले होते. मात्र सध्या काळू धरण अस्तित्वात नाही. ते भविष्यात होणार आहे. मात्र आत्ता पाणी प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सरकारने मंजूर करावी अशी मागणी आमदार भोईर यांनी केली आहे.