उदय सामंत हल्ल्यावर रामदास कदमांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्लानंतर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आपण स्वाभिमानी आहोत, पण हतबल नाहीय, असं आमदार उदय सामंत यांनी हल्लानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तर आता माजी मंत्री रामदास कदम यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : मंगळवारी बंडखोर आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्यावर पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. (Pune MLA Uday samant attack) आमदार उदय सामंत (Uday Samant) यांची कार कार्यकर्त्यांना दिसली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काचदेखील फोडली. सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामध्ये गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या घटनेनंतर उदय सामंत यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case was registered after filing a complaint with the police)

    दरम्यान, उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्लानंतर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आपण स्वाभिमानी आहोत, पण हतबल नाहीय, असं आमदार उदय सामंत यांनी हल्लानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तर आता माजी मंत्री रामदास कदम यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. या हल्लाचा निषेध करताना, सामंतावर हल्ला करणे हे मर्दानगीचं लक्षण नाही, अस वक्तव्य रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलंय. त्यामुळं आगामी काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.