बारसू रिफायनरीबाबत जनतेचा गैरसमज दूर करण्याचं काम प्राधान्यानं करणार – उदय सामंत

काही गैरसमज झाले असतील, तर ते आधी दूर केले जातील. आणि मगच प्रकल्प केला जाईल असं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार राजन साळवी, आदिती तटकरे आदी उपस्थित होते. कोकणातील हजारो युवक युवती बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी कोकणात चांगले प्रकल्प आणले जातील. रिफायनरीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित लोकांची बैठक पुन्हा एकदा घेण्यात येईल. असं उदय सामंत यांनी सांगितलं.

    मुंबई – कोकणातील बहुचर्चित बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे, याबाबत स्थानिकांनी आंदोलन केले आहे. यामुळं रोज विरोध वाढत आहे. दरम्यान, आज मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गैरसमज झाले असतील, तर ते आधी दूर केले जातील. आणि मगच प्रकल्प केला जाईल असं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार राजन साळवी, आदिती तटकरे आदी उपस्थित होते. कोकणातील हजारो युवक युवती बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी कोकणात चांगले प्रकल्प आणले जातील. रिफायनरीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित लोकांची बैठक पुन्हा एकदा घेण्यात येईल. असं उदय सामंत यांनी सांगितलं.

    यावेळी त्यांनी कोयना धरणाचं पाणी रिफायनरीसाठी वापरणार आहे, तसेच कोयनेतून बारसूपर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकणार असल्याचं म्हटलं. पाण्याचं व्यवस्थापण ही गावची जबाबदारी असेल, जमिनीचा दर आणि अन्य प्रश्नासाठी पुन्हा एक बैठक घेणार असल्याचं सामंत म्हणाले. राजन साळवी यांची भूमिका सकारात्मक आहे, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उद्योग विभाग कार्य करेल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांवर दबाव टाकून आम्ही कोणतंही काम करणार नाही. जनतेचा गैरसमज दूर करण्याचं काम प्राधान्यानं करणार असल्याचं सामंत म्हणाले. या बैठकीला कोणीही राजकीय रंग देऊ नये. असं देखील सामंत शेवटी म्हणाले.